You are currently viewing भीमाशंकर – भोरगिरी ट्रेक
Bhimashankar Jungle Trek

भीमाशंकर – भोरगिरी ट्रेक

धुक्यात हरवलेल्या वाटेने धनदाट जंगलाचा अनुभव

इको फ्रेंडली क्लबचा भीमाशंकर-भोरगिरी परिसरात ट्रेक

सोलापूर : घनदाट जंगल.. रिमझिम पाऊस.. धुक्यात हरवलेली पायवाट.. खळखळून वाहणारे ओढे.. उंचावरून कोसळणारे धबधबे.. भरून वाहणार्‍या नद्या.. अशा निसर्गरम्य वातावरणात सोलापुरातील इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी भीमाशंकर-भोरगिरी परिसरात जंगल ट्रेकचा अनुभव घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सोलापुरातील निसर्गप्रेमी इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून भीमाशंकर परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टवर दाखल झाले. एमटीडीसी रिसॉर्टचे व्यवस्थापक सचिन सदाकाळ यांनी परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती दिली. चहा-नाश्ता झाल्यानंतर सर्वजण भीमाशंकर मंदिर परिसरात पोचले. श्री भीमाशंकर संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे यांची भेट घेऊन इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. अ‍ॅड. कौदरे यांनी इको फ्रेंडली क्लबचे कौतुक करून निसर्ग भ्रमंतीसाठी शुभेच्छा दिल्या.

भीमाशंकर मंदिराचे बाहेरून दर्शन घेऊन स्थानिक गाईड स्वप्नील शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर जंगल ट्रेकला सुरवात केली. घनदाट जंगलातील धुक्यात हरवलेल्या पायवाटेने ट्रेक करत सर्वांनी रिमझिम पावसाचा आनंद घेतला. ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या घनदाट जंगलातून भटकंती केली. सायंकाळी सर्वजण भोरगिरी परिसरात पोचले. रात्री भीमाशंकर रिसॉर्टवर मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती.दुसर्‍या दिवशी सकाळी सर्वजण भोरगिरी किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले. सुरक्षितपणे नदी ओलांडून भोरगिरी ट्रेकींगला सुरुवात झाली. उंचावरुन दिसणारे धबधबे, हिरवा निसर्ग पाहून सारेच आनंदून गेले. भोरगिरी किल्ल्यावरील गुहेमध्ये असलेल्या लिंगाचे दर्शन घेवून इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय.. वंदे मातरम.. या घोषणा दिल्या. खाली उतरुन सर्वांनी कोटेश्वर मंदिर परिसरात वनभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर भिवेगाव परिसरातील मिनी देवकुंड हा धबधबा पाहण्यासाठी ट्रेकर्स मार्गस्थ झाले. उंचावरुन कोसळणार्‍या धबधब्याखाली सर्वांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.

दोन दिवसाच्या या निसर्ग भ्रमंतीमध्ये इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी जबाबदार पर्यटनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन केले. स्थानिक गाईड स्वप्नील शिर्के आणि त्यांच्या कुटूंबीयांनी जेवणाची छान व्यवस्था केली होती.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी कोकणे, सदस्य प्रकाश आळंगे, समर्थ देशपांडे, अभिषेक दुलंगे, संतोषकुमार तडवळ, मलिका पाटील, वैशाली सरतापे, मेघना जोशी, रुपा जकनाईक, यश कोकाटे, आदित्य गाडेकर, विवेक वाले, माधव वडजे, पोलीस अंमलदार सोमा मठपती, सौ. अर्चना स्वामी-मठपती, विवेक वाले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ट्रेकमध्ये डॉ. राघव नंदर्गी, रेल्वे अधिकारी संतोष घुगे, अनिल शेगाव, दिंडोरे, ओंकार मोहोळकर, सिद्धी सरतापे, सत्यम सरतापे, प्रशांत भोसले, दिनेश गजभार, मुकुंद जोशी, मयुरी जोशी, अजितकुमार सूर्यवंशी, सुजय घोरपडे, माधुरी जाधव, मोनिका जाधव, विनय दिंडोरे, लक्ष्मीकांत वळसंगे, रेणुका कलशेट्टी, अबोली पवार, ऐश्वर्या स्वामी, प्रियंका डोणज, श्रीनेश कांबळे, प्रथम पाटील, राजश्री जकनाईक, दीक्षा दुलंगे-नागा, समृद्धी अवसेकर, स्वप्निल बिराजदार, आदित्य शिंदे, ऋषिकेश गवसणे, अथर्व इंगळे, शौनक इंगळे आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply