You are currently viewing कोकण भटकंती
मुरुड जंजिरा किल्ला

कोकण भटकंती

कोकण भटकंतीने वाढविला उत्साह

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे येथील निसर्गप्रेमींनी कोकण भटकंती केली. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा किल्ला, काशिद बीच आणि कोरलाई किल्ला परिसरात भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.

25 नोव्हेंबर रोजी सर्वजण होम मैदान येथून मार्गस्थ झाले. 26 नोव्हेंबर रोजी सर्वजण चिकणी गावातील स्वप्नाली टुरिस्ट होम येथे पोचले. फ्रेश झाल्यानंतर सर्वांनी चहा-नाश्ता केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय.. च्या घोषणा देत मुरुड येथील जंजिरा किल्ला परिसरात पोचले. बोटींग करत सर्वजण जंजिरा किल्ल्यावर पोचले. बोटींग क्लबचे सचिव शहनवाज भाई आणि त्यांचे सहकारी इमरान भाई यांनी जंजिरा किल्ल्याविषयी माहिती सांगितली. जंजिरा किल्ल्यावरुन दिसणारा पद्मदुर्गही सर्वांनी पाहिला.

जंजिरा किल्ल्याच्या भटकंतीनंतर सर्वजण सुरक्षितपणे बोटींग करत पुन्हा एकदा मुरुड परिसरातील राजपुरी गावातील जेट्टीवर पोचले. मुरुड येथील पाटील खानावळ येथे दुपारचे जेवण केले. सायंकाळी चिकणी येथील स्वप्नाली टुरिस्ट होम येथे पोचून सर्वजण फ्रेश झाले. त्यानंतर सायंकाळी स्थानिक बीचवर फेरफटका मारला.

रात्री कोकण भटकंतीमध्ये सहभागी इको फ्रेंडली क्लबचे सदस्य संतोषकुमार तडवळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी तडवळ यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमानंतर महादेवी कोळी, सरस्वती कोकणे यांनी गाणी सादर केली.

दुसर्‍या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी सकाळी लवकर उठून सर्वजण पुन्हा एकदा समुद्र किनार्‍यावरील भटकंतीसाठी रवाना झाले. यावेळी अनेकांनी वॉटर स्पोर्टचा आनंद घेतला. अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात खेळून आनंद व्यक्त केला. फ्रेश आणि चहा-नाश्ता झाल्यानंतर सर्वजण काशीद बीचवर पोचले. उत्साही वातावरणात काही सदस्यांनी कुटूंबीयांसोबत पॅरासेलिंग केले. दुपारच्या जेवणानंतर सर्वजण कोरलाई किल्ला परिसरात पोचले. समुद्र किनार्‍यावरुन सुर्यास्त पाहून सारेच आनंदून गेले.

रोहा परिसरातील सुरुची हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण केल्यानंतर सर्वजण पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादच्या दिशेने रवाना झाले. या कोकण भटकंतीसाठी इको फ्रेंडली क्लबचे मार्गदर्शक, रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी ऊर्फ अजित कोकणे, जेष्ठ सदस्य माधव वडजे, संतोषकुमार तडवळ, विवेक वाले, रेल्वे अधिकारी संतोष घुगे, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक मदन पोलके यांच्या नेतृत्वाखालील या कोकण भटकंतीमध्ये महानंद वडजे, सुधीर गावडे, पुनम गावडे, अनुराधा जेवळीकर, सीमा डोके, वैशाली डोंबाळे, अनिता खडतरे, डॉ. राजश्री मठ, डॉ. प्रज्ञा मिस्त्री, कार्तिकेय मठ, मंजुषा कलशेट्टी, ओंकार कलशेट्टी, गायत्री कलशेट्टी, मनीषा इंदापुरकर, भाग्यश्री गायकवाड, पोर्णिमा पोलके, सायली पोलके, संकेत पोलके, भीमा स्वामी, सीना स्वामी, नजमुन्निसा मुजावर, श्रीशैला सोनकांबळे, विद्या गायकवाड, वैशाली सरतापे, सत्यम सरतापे, आनंद कोळी, महादेवी कोळी, विवेक कोळी, माधुरी कोळी, श्रीनिवास गोसकी, आरती गोसकी, सोनाली काशिद, शिल्पा तडवळ, आर्थव तडवळ, आरव जाधव, प्रसाद गायकवाड, गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, आराध्या कोकणे आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply