You are currently viewing हरिश्चंद्रगड ट्रेक
धुक्यात हरवलेला कोकणकडा

हरिश्चंद्रगड ट्रेक

धुक्यात हरवलेल्या हरिश्चंद्रगडावर उत्साही भटकंती!

पावसातला सह्याद्री अनुभवण्यासाठी इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

अकोले : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने 5 आणि 6 ऑगस्ट रोजी भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. धुक्यात हरवलेल्या हरिश्चंद्रगडावर सुरक्षितपणे भटकंती करून सर्वांनी पावसाळ्यातला सह्याद्री अनुभवला.
4 ऑगस्ट रोजी सोलापूर, पुणे आणि औरंगाबाद येथील निसर्गप्रेमी अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेच्या दिशेने रवाना झाले. 5 ऑगस्ट रोजी सर्वजण अकोला येथील मातोश्री लॉन या ठिकाणी जमले. वार्मअप, चहा- नाश्ता झाल्यानंतर सर्वजण भंडारदरा परिसरातील प्रसिद्ध अशा रंधा धबधबा परिसरात पोहोचले. कोरोना नियमांचे पालन करत सर्वांनी रंधा धबधबा परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला.
दुपारच्या जेवणानंतर सर्वजण पाचनई गावात दाखल झाले. चहा घेतल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेकिंगला सुरुवात झाली. दोन ते अडीच तासात सर्व ट्रेकर्स हरिश्चंद्रगडावर पोहोचले. स्थानिक गावकरी किरण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इको फ्रेंडली क्लबच्या ट्रेकर्सची जेवणाची आणि गुहेमध्ये मुक्कामाची व्यवस्था केली होती.
6 ऑगस्ट रोजी सकाळी धुक्यात हरवलेल्या हरिश्चंद्रगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय.. च्या घोषणा देत सर्वजण कोकणकडा परिसराकडे रवाना झाले. अधून-मधून येणारा पाऊस आणि हिरवा शालु नेसलेल्या कोकणकडा परिसरात सर्वांनी अद्भुत निसर्ग अनुभवला. हरिश्चंद्रेश्वराचे दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली सर्वांनी सुरक्षितपणे भिजण्याचा आनंद लुटला.
स्थानिक गावकरी, पोलीस प्रशासन आणि वन विभाग यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करत इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी कोकणे, मार्गदर्शक मदन पोलके, पुणे विभागाचे समन्वयक महेंद्र राजे, औरंगाबादचे समन्वयक जगन्नाथ राऊत, सीए ललित मगदूम, माधव वडजे, पंढरपूरच्या रेखा चंद्रराव, दुर्गा थिटे, अनुप दोशी, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्रसिंग बायस, संतोष तडवळ, सुयश आणि सोनाली खानापुरे, प्रा. डॉ. शिवाजी मस्के, सागर माळी, अनिरुद्ध कदम, संदीप पिस्के, अभिषेक दुलंगे, सोनाली थिटे यांच्या नेतृत्वाखाली सर्व निसर्गप्रेमींनी ट्रेकिंगमध्ये उत्साही सहभाग नोंदविला. अकोले परिसरातील मातोश्री लॉन येथे चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
हरिश्चंद्रगड भटकंतीमध्ये सीए सनी दोशी, ज्योतिबा जाधव, विठ्ठल नरवडे, विनोद चुंगे, प्रा. अरविंद दळवी, प्रा. डॉ. दीपक नारायणकर, विक्रम गोडसे, अरविंद ताटे, दत्तात्रय माने, मंगेश माने, डॉ. सुगंधराज कुलकर्णी, आर्यन कदम, प्रमिला बुरुंगुळे, मलिका बसंगर, विद्या अक्कलकोटे, तनया अक्कलकोटे, ओंकार उदगिरी, हर्षवर्धन दातार, संदीप पिस्के, अनिकेत पाटील, आकांक्षा पाटील, अमिता चव्हाण, प्रणिता खरात, भक्ती काळे, वेदश्री भादुले, संजना सुरवसे, सूचिता पाटील, ऋषिता पाटील, ऋषिकेश मदने, अथर्व मदने, संकेत चंद्रराव, प्रथमेश लव्हेकर, शिवम देवकते, आशिष खरात, सत्यम कारंडे, सीए सुनील इंगळे, अथर्व इंगळे श्रेया मगदूम, परम मगदूम, श्रीनिवास गोस्की, नरेश बोलाबत्तीन, रामकृष्ण गोणे, भास्कर इराबत्ती, अंबादास कंडीकटला, रजनी कंडीकटला, श्रीनिवासन नल्ला, विवेकानंद वाले, जयेश मिठ्ठापल्ली, गुरु कदम, रवी हवळे, स्वाती हवळे, सोहम थिटे, प्रितीश धुपद, प्रिया धुपद, श्रुती करपे, नेहा करपे, आकांक्षा नल्ला, स्नेहल खोत, सिद्धी सोनीमिंडे, मेघना राव, आदित्य नल्ला, निशांत करपे, अभिषेक जाधव, स्वप्नील लातुरे, अमृत भावे, उज्वल मारडकर, महेश म्हेत्रे, फैजान सय्यद, संकेत फडतरे यांनी सहभाग घेतला. प्रवास सुखकर होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्स यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply