You are currently viewing केंजळगड – रायरेश्वर ट्रेक
रायरेश्वर ट्रेक

केंजळगड – रायरेश्वर ट्रेक

सोलापूरकरांनी अनुभवला सह्याद्रीला फुलोत्सव

इको फ्रेंडली क्लबची केंजळगड आणि रायरेश्वर पठारावर भटकंती

 
लाल, पिवळ्या, निळ्या, गुलाबी, पांढर्या फुलांनी सजलेल्या केंजळगड आणि रायरेश्वर पठारावर सोलापूरसह पुणे, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद येथील निसर्गप्रेमींनी भटकंती केली. निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर आणि तेथून जवळच असलेल्या केंजळगडावर शनिवार आणि रविवारी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले.
सर्व निसर्गप्रेमी शनिवारी सकाळी केतकवळे येथे पोचले. प्रति बालाजी मंदिराच्या दर्शनानंतर भोर जवळील नेकलेस पॉईंटला भेट देवून सर्वांनी छान फोटोग्राफी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत दुपारी केंजळगड ट्रेकिंगला सुरुवात झाली. विविध रंगी फुलांनी सजलेल्या केंजळगडावरील पायवाटेने जाताना सर्वांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. उंचावरुन दिसणारा सह्याद्री पाहून सर्वजण आनंदून गेले. भोर येथील आरोग्य कर्मचारी आणि युट्यूबर अजित वेणुपुरे यांनी भोर परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती सांगितली.
मुक्कामासाठी सर्वजण सुखरुपपणे रायरेश्वरावर पोचले. यावेळी अनेकांनी पहिल्यांदाच नाईट ट्रेकचा अनुभव घेतला. रायरेश्वर पठारावर टेंटमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. रायरेश्वर फोर्ट कॅपिंगचे सचिन जंगम आणि त्यांच्या कुटूंबीयांनी जेवणाची व्यवस्था केली होती.
रविवारी सकाळी सर्वांनी रायरेश्वराचे दर्शन घेतले. ज्या ठिकाणी साक्षात छत्रपती शिवरायांची आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, तिथे सर्वजण नतमस्तक झाले. इको फ्रेंडली क्लबच्यावतीने सर्वांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. इको फ्रेंडली क्लबचे सदस्य प्रतीक पाटील यांनी शपथेचे वाचन केले.
त्यानंतर ट्रेकर्स रायरेश्वरावरील सात रंगाची माती पाहण्यासाठी गेले. एकाच परिसरात सात रंगांची माती पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. दुपारचे जेवण करुन सर्वांनी रायरेश्वराचा निरोप घेतला.
सायंकाळी निसर्गप्रेमींचा हा जथ्था निगुडघर गावाकडे रवाना झाला. प्रसन्न आलाटे यांच्या आलाटेज गेस्ट हाऊसमध्ये रात्रीच्या जेवणाचे छान नियोजन करण्यात आले होते. जेवणानंतर सोलापूर आणि पुण्यातील निसर्गप्रेमींनी एकमेकांचा निरोप घेतला. इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी ऊर्फ अजित कोकणे, पुण्याचे समन्वयक महेंद्र राजे, स्वाती इंगळे-भोसले, प्रसाद मुगळे, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक मदन पोलके, महसुल कर्मचारी माधव वडजे, समर्थ देशपांडे, प्रतीक पाटील, सोनाली थिटे, सोहम थिटे, शाम भराडीया, संतोषकुमार तडवळ, राम जाधव, नागेश स्वामी, विवेक वाले यांच्या नेतृत्वाखाली संतोष घुगे, शशांक सरदेशमुख, श्रीरंग सराफ, पल्लवी डिंगरे, श्रुती सिध्दापुरमठ, स्वानंदी देशपांडे, प्रणव सिध्दापुरमठ, नचिकेत काकडे, श्वेता काकडे, रसिका काकडे, आर्या गोरटे, अपुर्णा दामले, ऐश्वर्या गुमटे, ओंकार मोहोळकर, आयुष दिवाणजी, अन्वय देशपांडे, स्मीता बिराजदार, स्वप्नील जाधव, स्वाती जाधव, आदित्य गाडेकर, आर्यन कवडे, वरदा कुलकर्णी, ऐश्वर्या कदम, शिवानी वळसंगे, सई कोकाटे, आरती जतकर, पल्लवी कदम, कार्तिकी कदम, दिप्ती कदम, वैष्णवी कोकाटे, मयुरी जोशी, अर्पिता फडतरे, स्नेहल फडतरे, ऋतुजा फडतरे, सुकन्या सरवदे, प्रज्योत पालम, ऋषिकेश होनमुर्गी, रोहन कामुर्ती, विशाल मादगुंडी, पवन विजापुरे, संकेत पोलके, मंगेश माने, राहुल जगताप, सोनाली जगताप, प्रा. श्रीधर चव्हाण, सुरेश नारायणकर, अजय परांडकर, सौरव बटगिरी, श्रेयश भांजे, दयानंद आडके, जयश्री आडके, ओंकार आडके, विकास ढाले, जकराया डवले, जसपाल काळे, वैष्णव शिंगन, स्पंदीता पुजारी, प्रभाकर इरशेट्टी, राघवेंद्र पिल्लई, शिवकुमार राऊतराव, मयुर दुदगी, श्रीकृष्ण माढेकर, गायश्री माढेकर, सुश्मिता अग्रवाल, संपदा देशपांडे, डॉ. सृष्टी शहा, समृध्दी कदम, जागृती स्वाती, गिरीष स्वामी, धुव्र बाफना, मयुर दुदगी, किर्ती भराडीया, श्रेया भराडिया, हितेश भराडीया, वेदांत सारडा, अक्षत संकलेचा, यश मुंदडा, पुणे येथील सदस्य वंदना भालेराव, श्रेया गायकवाड, प्रिया चव्हाण, सुजाता पाटील, सोनाली जाधव, दिप्ती जाधव, गार्गी जाधव, रक्षा गोरटे, मुक्ता गोरटे, श्रध्येद दानी, सन्मित रणदिवे, व्यंकटेश मादम, केशव गोयल, आस्था माने, आर्या माने, पल्लवी मुगळे, प्रणवी मुगळे, ऋत्विक पाटील, विश्वजीत भरले, समीक्षा यरवार, सांगली येथून आलेले प्रा. अमोल पाटील, औरंगाबाद येथून आलेल्या रेवती देशपांडे, कोल्हापूर येथून आलेले राम शेंदारकर यांनी या निसर्गभ्रंमतीमध्ये सहभाग नोदविला.

Leave a Reply