You are currently viewing सांदण दरी – कळसूबाई ट्रेक
कळसूबाई ट्रेक

सांदण दरी – कळसूबाई ट्रेक

इको फ्रेंडली क्लबचा - चला निसर्गावर प्रेम करुया.. उपक्रम;

विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सहभाग

चला निसर्गावर प्रेम करुया.. या उपक्रमाअंतर्गत इको फ्रेंडली क्लबने महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर ट्रेकींगचा उपक्रम राबविला. व्हॅलेंटाईन डेनिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थी, पालक, डॉक्टर, पोलिस, वकील, शिक्षकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला.

निसर्ग पर्यटनाची आवड वाढावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबने व्हॅलेंटाईन डेनिमित्त भंडारदरा, सांदण दरी, घाटघर येथील कोकणकडा आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर परिसरात निसर्ग भ्रमंती केली. पहिल्या दिवशी आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सांदण दरी ट्रेकींग करण्यात आले.

चारशे फुट खोल दरीत छोट्या-मोठ्या दगडांवरुन पुढे जात निसर्गाचा अद्भुत चमत्कार अनुभवला. सायंकाळी सांदण दरीच्या वरच्या बाजूला जावून सुर्यास्त पाहिला. यावेळी महापारेषणचे अधिकारी मंदार डांगे यांनी कही दूर जब दिन ढल जाये.. हे गाणे सादर केले. रात्री भंडारदरा जलाशयाशेजारी टेंटमध्ये मुक्काम केला. साम्रद गावात मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था करणार्‍या बांडे कुटूंबीयांना सोलापूरची चादर आणि आंब्याचे रोप भेट देण्यात आले.

रविवारी सकाळी पांजरे गावातून सर्वोच्च कळसूबाई शिखर ट्रेकींगला सुरुवात करण्यात आली. जंगल वाटेने सर्वोच्च शिखरावर पोचल्यावर दिसणारे निसर्ग पाहून सारेच आनंदून गेले. यावेळी तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम.. या घोषणा दिल्या. कळसूबाई देवीचे दर्शनानंतर बारी गावातून सर्वजण सुरक्षितपणे खाली उतरले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, सदस्य महेंद्र राजे, अजित कोकणे, अभिषेक दुलंगे, शिक्षक मदन पोलके, सोलापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्रसिंग बायस, पोलीस दलातील श्रीरंग कुलकर्णाी, संतोष वाघमारे, अ‍ॅड. विनोद सुर्यवंशी, पल्लवी सूर्यवंशी, अरविंद ताटे, मल्लिका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविणयात आला. यात सोलापुरातून महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सी.एन.रेड्डी, रोहित मंडला, वैरागचे जीवन शिवशेट्टी, राहूल जतकर, सुनील कोनापूरे, शिक्षक रवी बिराजदार, संतोषकुमार तडवळ, रामचंद्र जाधव, हिरामण पवार, दत्तात्रय माने, संदीप गायकवाड, सुहास जाधव, मनीष बांगर, पोपट उमप, अतुल नारकर, शकील शेख, नितीन वरवडकर, प्रशांत उपाध्ये, संतोषकुमार कदम, रेल्वे विभागातील जकराया ढवले, विकास ढाले, प्रियांका जाधव, ऋषिता कुलकर्णी, मैथिली कुलकर्णी, ऋषिकेश घोडके, विद्या घोडके, योगा शिक्षक अनिता कोडमुर, पुजा जैसवाल, सामाजिक कार्यकर्ते योगेश कबाडे, ऊर्जा तिवारी, आर्या सुर्यवंशी, शुभम टेकाळे, नितीन पवार, प्रकाश पंचे, हर्षवर्धन दातार, अनिता वाघमारे, अ‍ॅड. मयुरी भालेदार, माधव वडजे, बसवराज संख, अक्षय शेंडगे, अर्थव नाईक, ऋषी नाईक, डॉ. अचर्ना संगेवाडीकर, संस्कृती संगेवाडीकर, संतोष घुगे, ऐश्वर्या घुगे, परीमल जाधव, विनीत कटारीया, तनया मल्लाडे, राजेश्वरी कटकधोंड, राहूल हुंडरे, वेदांत काळे, कार्तिकी कदम, मानव शहा, प्रथमेश मुळीक, समर्थ माळी, निरंजन चेळेकर, श्रीराज बुरा, ऋषिकेश गवसने, राघव बेडगनूर, अनिरुध्द कदम, सोहम कुलकर्णी, सोहम जोशी, आदित्य शिंदे, स्वाती शागालोलू, आदित्य गाडेकर, वरुन राजेपांढरे, हर्षल खंडावे, पुणे येथून प्रसाद मुगळे, पल्लवी मुगळे, जितेश कडू, दीप्ती कडू, सीमा शिवशेट्टी, सोमनाथ निराली, सौमित्र मुंडेवाडी, आदिती राजूरकर, श्रध्दा राजूरकर, वैशाली मुळे, अषिभेक मुळे, आस्था माने, रोहित सुतार आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

--

छोट्यांचा उत्साही सहभाग
महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर ट्रेकींगमध्ये कुशाग्र वागज, देवांश क्षीरसागर, भक्ती पंचे, पार्थ सुर्यवंशी, प्रणवी मुगळे, मल्हार कडू, आर्या सुर्यवंशी या मुला-मुलींनी उत्साही सहभाग घेतला होता.

Leave a Reply