You are currently viewing शिवनेरी – चावंड (प्रसन्नगड) ट्रेक
परतीच्या प्रवासातील रात्रीचे जेवण

शिवनेरी – चावंड (प्रसन्नगड) ट्रेक

प्रसन्नगडावर निसर्ग भ्रमंतीने नववर्षाचे स्वागत

शिवनेरीवर केली स्वच्छता मोहीम; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

नववर्षाचे स्वागत निसर्गाच्या सानिध्यात या उपक्रमांतर्गत इको फ्रेंडली क्लबच्यावतीने पर्यटन तालुका असलेल्या जुन्नरमध्ये निसर्ग भ्रमंती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

सोलापुरातून निघताना श्री. आप्पासाहेब पाटील ,अध्यक्ष शिक्षक सेना पुणे विभाग, सौ. सीता आप्पासाहेब पाटील, सरचिटणीस प्राथमिक शिक्षक संघ, सोलापूर, इको फ्रेंडली क्लबचे ज्येष्ठ सदस्य संजीवकुमार कलशेट्टी यांनी सर्व ट्रेकर्सला शुभेच्छा.

31 डिसेंबर रोजी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर साखळदंड मार्गाने ट्रेकिंगला सुरवात करण्यात आली. प्रारंभी माजी सैनिक, वनरक्षक रमेश खरमाळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ट्रेकिंग करताना सहभागी सदस्यांनी प्लास्टिक, दारूच्या बाटल्यांचे संकलन केले. हा कचरा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. येथील लेण्यांची माहिती गडकिल्ल्यांचे अभ्यासक विनायक साळुंखे यांनी दिली. शिवनेरीच्या पायथ्याला असलेल्या शिवबी कृषी पर्यटन केंद्र याठिकाणी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. इको फ्रेंडली क्लबच्यावतीने आंब्याचे झाड भेट देण्यात आले. बाळासाहेब परदेशी-दुबे आणि त्यांच्या कुटूंबीयांना सन्मान करण्यात आला. त्यानंतर ऐतिहासिक नाणेघाटाला भेट देवून सुर्यास्ताचा आनंद घेतला.

सायंकाळी माजी सैनिक, वनरक्षक रमेश खरमाळे यांनी मानव-बिबट्या संघर्षाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच जुन्नरमधील पर्यटन स्थळांची माहिती दिली. यावेळी माजी सैनिक सुरेश भोर, पोष्ट विभागातील डाक सहायक अनंत होंड्रे, छायाचित्रकार राज पवार उपस्थित होते. प्रास्ताविक इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षीका आळंगे यांनी केले. मान्यवरांना सोलापूरची चादर, नॅपकीन बुके आणि आंब्याचे झाड भेट देण्यात आले.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्राचीन कुकडेश्वर मंदिराला भेट देवून इतिहास जाणून घेतला. त्यानंतर 3 हजार 400 फूट उंच चावंड ऊर्फ प्रसन्नगडावर ट्रेकिंग करण्यात आले. सायंकाळी अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री येथील गिरीजात्मज गणेशाचे दर्शन घेतले. गौरी हॉटेलचे संचालक संजय वाणी यांनी रात्रीच्या जेवणाची छान व्यवस्था केली होती. दोन दिवसाची निसर्ग भ्रमंती कशी झाली हे यावेळी सदस्यांनी सांगितले.

वसुंधरामित्र, इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, सदस्य महेंद्र राजे, सोनाली थिटे, वंदना आळंगे, अभिषेक दुलंगे, जगन्नाथ राऊत, परमेश्वर जाधव, अजित कोकणे, प्रतीक पाटील यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. यात सहकार विभागातील अधिकारी दत्तात्रय मोरे, आरती जतकर, कवी समर्थ देशपांडे, शिक्षीका मनीषा कलशेट्टी, सरिता शहा, ऋषीराज वासकर, पोष्ट विभागातील जीवन क्षीरसागर, विरेंद्र बंडी, अतुल थळकर, योगेश दळवे, उन्नती तिपे, सुरेश नारायणकर, जीवन शिवशेट्टी, मैथिली कुलकर्णी, निशा कापरे, उर्मी कुलकर्णी, स्नेहल चाकोरकर, रेश्मा सावकार, संतोष फुलारी, योगेश पंचे, अजयकुमार परांडकर, सिद्धाराम बिराजदार, फिरदोस शेख, सागर वागज, कुशाग्र वागज, शुभम वागज, सोहम क्षीरसागर, सार्थक क्षीरसागर, प्रदीप काकडे, प्रतीक्षा आळगे, डॉ. जयश्री इंगळे, तन्वी सोनवणे, संतोष फुलारी, उर्मी कुलकर्णी, प्रांजली बुरुंगुळे, सई कोकाटे, शिवानी वळसंगे, श्रुतिका दिंडोरे, आर्यन कदम, दुर्गा थेटे, सुनील थिटे, प्रतीक दिघे, सोहम थेटे, ऐश्वर्या पतकी, वर्षा आळसंदे, अनिकेत राठोड, दीप्ती कदम, अथर्व बडवे, गायत्री चव्हाण, श्रुतिका चव्हाण, शरयु देशमुख, देवांश क्षीरसागर, पूर्वा देशमुख, अथर्व भट, श्रद्धा वालीकर, पूजा सुर्वे, स्नेहल आलेगाव, महादेव वडजे, आरती जतकर, प्रज्वल पवार, प्रभात आळंगे, मानसी गोरे, धैर्य गोरे, ऋचा सातपूरकर, ऋग्वेद सातपूरकर, राजू ढोणे, विनायक येळे, गंगुबाई कोकणे, ऋतुजा निराळे, राशी निराळे, राज पवार, अभिषेक तांदळे, पुष्कर शिंदे, ओम पवार, ओम शेट्टी, कुलदीपसिंह चव्हाण, भूषण सुरवसे, मैथिली कुलकर्णी, चंद्रिका धनशेट्टी, उमाकांत धनशेट्टी, मंजुनाथ धनशेट्टी, सुनंदा नारायणकर, पूजा बिच्चे, मयुर बैटपल्ली, निशा कापरे, ऋतुजा कांबळे, रोहित लोखंडे, अनुराग चोपडे, सीमा शिवशेट्टी, श्रीमती जयश्री राऊत, कु.नेहा राऊत, अनंत वाघमारे, जालना, वर्षा ठाकूर, जालना, श्रीमती जिज्ञासा जाधव, औरंगाबाद, ऊमेश कुलकर्णी, श्रीमती सिमा कुलकर्णी, कु.वैष्णवी कुलकर्णी, कु. माधवी, औरंगाबाद, गणेश कदम,औरंगाबाद, श्रीमती ऊर्मिला कदम, औरंगाबाद सहभागी झाले होते.

Leave a Reply