You are currently viewing सिंहगड – राजगड ट्रेक
राजगड ट्रेक

सिंहगड – राजगड ट्रेक

सिंहगड आणि राजगडावर भ्रमंती

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबने दिवाळीच्या सुट्टयानिमित्त सिंहगड आणि राजगड ट्रेकिंगचे आयोजन केले होते. अनेक पालकांनी आपल्या मुला-मुलींसह या उपक्रमात सहभागी होऊन निसर्गाचा आनंद घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता ट्रेकिंग दरम्यान घेण्यात आली. सात रस्ता परिसरातून प्रवासाला सुरवात झाली. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी सर्व ट्रेकर्सला शुभेच्छा दिल्या.

पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा जयघोष करत सोलापूरचे ट्रेकर्स जंगल वाटेने ऐतिहासिक अशा सिंहगडावर पोचले. तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करण्यात आले. राजगडाच्या पायथ्याला असलेल्या गुंजावणे गावात मुक्काम करण्यात आला. याठिकाणी राहूल बांदल यांनी परिसराची माहिती दिली. पहाटे राजगड ट्रेकिंगला सुरवात झाली. चोर दरवाजाने सर्वजण पद्मावती माचीवर पोचले. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावरील बालेकिल्ल्यासह विविध ठिकाणांना भेट देण्यात आली. गडावर गावरान जेवणाचा आस्वाद घेऊन पाली दरवाजा मार्गे सर्वजण खाली उतरले.

मुक्कामाची व्यवस्था करणार्‍या बांदल आणि जेधे परिवारास सोलापूरची चादर भेट देण्यात आली. तसेच याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरामित्र परशुराम कोकणे, ज्येष्ठ सदस्य संजीवकुमार कलशेट्टी, दुर्गा थिटे, मनीषा वासकर, अभिषेक दुलंगे, महेंद्र राजे, अजित कोकणे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात सहकार विभागाचे अधिकारी दत्ता मोरे, श्रीधर लिंबोळे, सोलापूर पोस्ट कार्यालयातील डाक सहायक अनंत होंडरे, लेखापाल श्रीरंग रेगोटी, डॉ. हर्षद वागज, युवा लेखक प्रतिक पाटील, बँक अधिकारी उमाकांत धनशेट्टी, चंद्रिका धनशेट्टी, शिक्षक संजयकुमार धनशेट्टी, मंजुनाथ धनशेट्टी, साधना धनशेट्टी, सुरभी धनशेट्टी, करुणा कदम, ऐश्वर्या कदम, आर्यन कवडे, विजय क्षीरसागर, देवांश क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते संदीप पिस्के, अनिता खरात, चैत्राली खरात, प्राची खरात, अनिकेत पाटील, सोनाली थिटे, सोहम थिटे,अनिता चव्हाण, अभिषेक चव्हाण, रेणुका चव्हाण, सारिका बंदीछोडे, स्वप्निल वट्टे, प्रथमेश कोळी, मेघराज येरटे, वरदा कुलकर्णी, ऋचा सातपूरकर, ऋषिकेश शागालोलू, पंढरपूरचे गायत्री बडवे, चैत्राली बडवे, भार्गवी बडवे, अथर्व बडवे, विशाल स्वामी आदी सहभागी झाले होते. यात अनेकांनी पहिल्यांदाच ट्रेकिंगचा अनुभव घेतला. इको फ्रेंडली क्लबमुळे ही संधी मिळाल्याची भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली.

छोट्यांचा उत्साही सहभाग..
नुमविचा विद्यार्थी देवांश विजय क्षीरसागर आणि इंडियन मॉडेल स्कूलचा विद्यार्थी कुशाग्र हर्षद वागज या दोघा छोट्या टेकर्सनी सर्वांचा उत्साह वाढविला. देवांश याने बालशिवबाच्या वेषात राजगडावर पोवाडा सादर केला. इको फ्रेंडली क्लबमुळे हे शक्य झाल्याचे भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Leave a Reply