eco friendly ganesha

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

आपले सर्वच सण अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी इको फ्रेंडली क्लब प्रयत्नशील आहे. यापूर्वी पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरीसपासून गणेशमूर्ती बनविणार्‍या सोलापुरातील स्थानिक मूर्तीकारांना इको फ्रेंडली क्लबने प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून मातीच्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवून घेऊन त्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध केल्या जात आहेत. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमास सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 • असे बनविल्या जातात इको फ्रेंडली गणेशमूर्ती

पाण्यात सहजपणे विरघळणार्‍या घटकांपासून गणेशमूर्ती बनवल्या जात आहेत. यासाठी शाडू माती, बॉम्बे माती, लाल मातीचा वापर केला जात आहे. पीओपी गणेशमूर्तीच्या तुलनेत या गणेशमूर्ती बनिवणे अधिक कष्टाचे काम आहे.

 • हे आहेत इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे फायदे –

पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली गणेशमूर्ती पुर्णपणे मातीपासून बनवल्यामुळे याचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही

 • पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली गणेशमूर्तीच का? 

 1. शास्त्रात पार्थिव म्हणजेच मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना सांगितली आहे.

 2. मातीची गणेशमूर्ती घरी विसर्जन करता येते. पाण्यात मूर्ती विसर्जन केल्यानंतर काहीवेळात विरघळते.

 3. गणेशमूर्ती विसर्जनानंतर पर्यावरणाला बाधा होत नाही.

 4. गणेशमूर्ती विसर्जनानंतर बॉम्बे माती, शाडू माती पुन्हा वापरता येवू शकते. लाल मातीमध्ये वृक्षारोपणही करता येते.

 5. पाण्यात विसर्जन केल्यानंतर गणेशमूर्ती पूर्णपणे विरघळते, त्यामुळे गणेशमूर्तीची विटंबना होत नाही.

 • पीओपी गणेशमूर्ती का नको?

 1. पीओपीची गणेशमूर्ती पाण्यात विरघत नाही, त्यामुळे मूर्तीची विटंबना होते.

 2. शास्त्रात पार्थिव म्हणजेच मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना सांगितली आहे.

 3. पीओपी पर्यावरणाला हानिकारक आहे. शिवाय रासायनिक रंगांचा अधिक वापर होतो.

 4. गणेशमूर्ती विसर्जनानंतर पीओपीमुळे पाण्यातील जलचरांना धोका निर्माण होतो.

 5. पीओपीची गणेशमूर्ती घरी विसर्जन करता येत नाही.

 • पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली गणेशमूर्ती महाग का?

 1. पीओपीच्या तुलनेत मातीच्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवणे अधिक कष्टाचे आहे.

 2. पीओपीची गणेशमूर्ती साचात बनवली जाते, इको फ्रेंडली मातीची गणेशमूर्ती हाताने बनवावी लागते.

 3. पीओपीच्या तुलनेत इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्यासाठी बराच वेळ लागतो.

 4. मातीच्या गणेशमूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांची संख्या कमी आहे. सोलापुरात फक्त 2 ते 3 हजार मातीच्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनतात.

 5. इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणारी बॉम्बे माती, शाडू माती आणि लाल माती पीओपीच्या तुलनेत महाग आहे.